प्राजक्त
अंगणात बहरुन आलाय प्राजक्त आज
तुझ्या आठवणींच्या प्रत्येक गंधात
दरवळतोय त्याचा सुवास
संथ वार्यावर होणारी सळसळ
अन् त्याच रंगाच्या ओढणीमागची तुझी हालचाल
त्या गंधात बहरलेली लांबसडक वेणी
अन् तेव्हा हातात उतरलेली एक लाजलेली कळी
हजार वार्या झाल्या असेल
प्राजकताच्या बहाण्यात माझ्या दारी
नजरभेटीची हूरहुर नयनी
ती नजर मिळताच तू मात्र गोरिमोरी
ऐश्या अनेक आठवणींचा सडा
वेचतसे मी
जेव्हा बहरे हा प्राजक्त
घेऊन आठवण तुझी माझ्या अंगणी.....
धनंजय :-)
Saturday, 9 January 2010
लग्नघटिका
लग्नघटिका
आज आयुष्य
सप्तपदीनी नव्याने चित्तारल
अन् लग्नाच्या वेदित मी तयाला
मन्त्राग्नित नव रूप घेताना बघितल...
अंतरपाटापलिकडे
आयुष्य एक नवा पट घेऊन उभ होत
अन् माळाबरोबरच अनेक संदर्भ
सुद्धा ते एकमेकाना देत होत...
तलहातावरच्या मेहेन्दित
जन्मली एक रेष नवी
तैशीच भाळीच्या कुंकवाने
रंगवली एक खूण राहिलेली जन्मवेळी..
कोणत्या तराजूत तोलु हे मन
एक डोळ्या हसू अन् दूज्या दिले आसु
सप्तपदीच्या हर पावलावर वाढवली तयाने
होती नव्या नात्यांची हूरहुर
अन् तूटनार्या रुनानुबंधांची तगमग..
दोन विधीनी तर भान्डावून सोडलय,
एक मंगळसूत्राच्या घट्ट विनीत
आज माझ मीपन त्याने सोडवलय,
आणिक कन्यादानाच्या वाहिलेल्या अर्ध्यात
माझ अर्ध आयुष्य...
धनंजय
आज आयुष्य
सप्तपदीनी नव्याने चित्तारल
अन् लग्नाच्या वेदित मी तयाला
मन्त्राग्नित नव रूप घेताना बघितल...
अंतरपाटापलिकडे
आयुष्य एक नवा पट घेऊन उभ होत
अन् माळाबरोबरच अनेक संदर्भ
सुद्धा ते एकमेकाना देत होत...
तलहातावरच्या मेहेन्दित
जन्मली एक रेष नवी
तैशीच भाळीच्या कुंकवाने
रंगवली एक खूण राहिलेली जन्मवेळी..
कोणत्या तराजूत तोलु हे मन
एक डोळ्या हसू अन् दूज्या दिले आसु
सप्तपदीच्या हर पावलावर वाढवली तयाने
होती नव्या नात्यांची हूरहुर
अन् तूटनार्या रुनानुबंधांची तगमग..
दोन विधीनी तर भान्डावून सोडलय,
एक मंगळसूत्राच्या घट्ट विनीत
आज माझ मीपन त्याने सोडवलय,
आणिक कन्यादानाच्या वाहिलेल्या अर्ध्यात
माझ अर्ध आयुष्य...
धनंजय
Subscribe to:
Posts (Atom)