Monday, 31 October 2011

हिरवाई –(माझी अपार्टमेंट)

हिरवाई –(माझी अपार्टमेंट)

तणा तणातून उगव रान
राना रानातून राहिल तण,
आन् फाडिला तुझा हिरवा शालू
ग माझी माय गो,

फाडिला तुझा हिरवा शालू
ग माझी माय गो....

येथे होत एक, पिम्पळाचे पान SS
तीत किती बांधीले होते झोके
अन् वडास सावित्रिच वान
उरल फक्त एक, उजाड ग उजाड

(गद्य)
मग मले हळूच काही तरी जानीवल
आन माहया पोराना हा वारसा म्या द्यायच ठरिवल

या रानावर उभारल एक जंगाल
तयाची सिमेंटाची खोड
त्यांची नाव राखली हिरवाई ,पानफुल
या खुरड्याला दिधला
मी दिधला हिरवा रंग

तेवढी जपली तुझी आठवण, आठवण

तणा तणातून उगव रान
राना रानातून राहिला तण,
आन् फाडिला तुझा हिरवा शालू
ग माझी माय गो…..

Saturday, 29 October 2011

सारीपाट

सारीपाट

मी मांडतो
मांडतो ग एक पट सारीपाट
उंटभाई जरी हा माझिया नात्यात
त्याची चाल रे चालच तिरकी बेरकी

यांचा डौलच दिसायला लाई भारी
आन ऐसा शेजारी अडिचचा घाट करी

आम्ही आपले मनाचे राजे असु
जीव मुठीत घेऊन कोपर्‍यात बसू
आस वाटते आम्हीच असु सरकार
पण वजिराच्या तालात
नाचे घरबार

त्यातही सापाडे ऐसेही सगे सोयरी
आपले आपले सरळ नाकासमोरी
ऐसे मदमस्त शेवटल्या कोनाड्यात
ते बेफिकर तुम्ही मरो तिकडे सुखदुखात

बारीकली जनता वाटे बाई बापुडी
डेली च्या पगारावारी चाले चूल भाकरी
एकच घर यांची असे चाल
पार ती त्यांच्या मार्जीची जीवनगाडी

आम्ही नामधारी
जीव येता मेताकुटिला
चेक मिळता जिवावरच पारसांग बाका
तेव्हा कोठे मर्जितले पाउल पडे
विचार करता याचे तेचे
बांधले गेले मन माझे

हा पट पटच लाई भारी
यात ना कोणी काळे आन कोणी ढवळे
येथे सारेच टाकटी एक डाव

जपून चला
कारण आपलाच रांग
ज़ादातर करी बेरंग
खर्‍या सारीपाटाहून अवघड वळणाचा
हा पट माझा जीवनाचा....

-
Dhananjay Sonawane