Sunday, 31 July 2011

प्रतिक्षा

प्रतिक्षा

कवेत किती घ्याव हे ओले आसमंत
हिरव्या त्या पर्णराशी
अन् शीरशीरणारा गारवा
अंधारणारी वेळ ,काळ्या नभांची चादर
अन् लख्ख प्रकाश पताका उत्तर दक्षिण

सोसाट्याच्या वार्‍याला संभाळताना
एका छत्रीत व्हावे तुझे बहाने
भीजलेल्या ओठांवर यावे थेंब मोहाच्या क्षणांचे

सौदामीनीच्या कडकडाटात
घाबरणार्‍या कामिनीने
मिठीत येत
हातांच्या कडीला पडलेल
अस्वस्थ रिकामे जागेच कोड सोडवाव्

ओल्या कांतीच्या स्पर्शातली
तगमग
भिडणारी नजर बावरती
आन् अजूनही या ऐश्या पहिल्या प्रेमधारेच्या
प्रतीक्षेत जाळतोय माझिया मनातील पाउस ओला

Monday, 7 March 2011

तनहाँयीया(यादे)

आज चार दिन हुए वो नही हे
क्या किया जाय ईन यादो को
न कोई अलमारी ना कोई तयखाना
बिना चावी के ही खुल जाती हे
दस्तक दिए बिना आती हे
और आपपे हावी हो जाती हे

तनहाँयीया(यादे)

तुम नही होती तो तुम्हारा ज़िक्र हर लब से करते हे
दोस्त यारो मे तुम्हारी बाते यूही छेड़ते
और हम बहक जाते हे

तुम होती तो ऐसा करते, हम करते वैसा
एक एक ख़याल दिल को छूके सपने बुनता हे
लहरो के ईजाजत बीना ही रेत का घर बनाते हे

क्या नही करते आपकी यादो मे
मासूम गलियो से पूछते आपका पता
उन बरतनो पे रख के हाथ आपको महसूस करते हे

बाते चंद ईन खाली दीवारो से
उनमे ही छुपे आपके ही अक्ससे
जो यहाँ आज छोड़ आए हे
गर फर्श पे लेटे
उसी गर्मी को हम आज याद किए जा रहे हे
-धनंजय

Wednesday, 11 August 2010

पापा

पापा

पापा माझा चिमुरडा आज मला पप्पा बोलला
डोळ्यांतल्या आसावंसरशी घड्याळाचा काटा
तीन दशक माग सरकला
ईवल्याश्या पावलांत मी त्या माझ बालपण बघितल...

दोन्ही डोळा वाहे गंगा आन् जमूना
तेव्हा स्मरे रडक्या पिलासाठीच्या
तयाच्या घरभर चकारा
असा चंद्राच्या साथीला हा सूर्य रोज रातीला जागला

शेरभर दुधासाठी गावभर पायपीट
आणवाणी पायांवर खड्या काट्याची लयलूट,
आज गाडी आन् चाकर तेव्हा मात्र
खांद्यावर भक्कम त्या
मी जग पालथा घातला

शर्टखाली लपवली ठिगळाची बंडी
अन् दुपारच्या जेवणाला म्हणे आज उपवासाची संधी
आईसक्रीमच्या हट्टासाठी त्याच्या अशा कितीतरी तर्‍हा
आजही नातवासाठी खाऊ बघ आधी त्यानेच रे आणला
त्यानेच रे आणला.........

Monday, 24 May 2010

कसे बोलले प्रेम क्षण

कसे बोलले प्रेम क्षण

कधी ओठांवर न चढणार्‍या शब्दांनी
बेमालूमपणे ती रात्र सजवली
तयांच्या स्पर्शाने आंधारी रात्रही लाजली

नजरेला भीडली नजर
पापण्यांच्या उघडझापीत चमकली विद्युलता
चार बाहुल्यांतुनी

हृदयाची वाढली धडधड
बंद जणू पडली श्वास ऊश्वासाची गती
अन् विरघळले ते प्रेमक्षण
तयांच्या उत्कट ओठ स्पर्शातुनी

-धनंजय

Monday, 3 May 2010

Lek

Thursday, 1 April 2010

She


SHE


Staring is only way looking at her
blinking is such waste of time

Just go on with ur talks
After so many days so many brain cells are talikng with me
ohhh god why you created so less no. of intelligent people on d earth

We went for shopping
I came out with anklet for her
& she was still in the pile of sarees
searching one for my mother

that’s her

Tuesday, 2 March 2010

हे दिनकरा....

कातरवेळचा अस्ताला जाणारा सुर्य ..आकाशात पसरलेली लालीमा
अशा वेळीस सुचलेले हे काही शब्द ..


हे दिनकरा....

कोणी बोले उन्ह उतरू लागल
त्याच तेज सरु लागल

मोठ्या झाल्या सावल्या
वेदनांची आर्तता त्यांच्या गाहिर्‍या आंधाराला

त्याची जखम फारच जाणवली
रक्ताची तया लाली आसमंतावर पसरली

दु:ख मोठ्या उराचे कोणा बोलता समजेना
सांगण्यासाठी ते, दुसरा सूर्य अवकाशात गवसेना

उदय अन् अस्तातही तेवढीच प्रतिमा
जगता मरतादेखील मोठ्यांच्या सारख्याच खुणा

अंधार्‍या रातीतही चांदण्यांचा शिडकावा
सूर्यदेवाच्या तेजावर चंद्राने तोलला

ऐश्या जगता मरता प्रकाशणार्‍या दीपस्तंभाना
माझ्या तोकड्या शब्दांचा नजराणा

-धनंजय