Sunday, 31 July 2011

ईच्छा राधेची

ईच्छा राधेची

मनात आहे एकच ईच्छा
तुझयत सामावून जावे सजना

अस्तित्व ना दुजे कोणते
रूप आता एकची उरावे

जीवास जैसा हा आत्मा
वा हवेत विरलेला गंध प्राजक्ताचा..
कोणास ना कळे त्यात नक्की भिन्न कोणता

वैसे व्हावे आज माझे
प्रेमात फक्त खाली हा कृष्ण उरावा
ना कळो कोणा कोठे गेली राधा...