Tuesday 2 March 2010

हे दिनकरा....

कातरवेळचा अस्ताला जाणारा सुर्य ..आकाशात पसरलेली लालीमा
अशा वेळीस सुचलेले हे काही शब्द ..


हे दिनकरा....

कोणी बोले उन्ह उतरू लागल
त्याच तेज सरु लागल

मोठ्या झाल्या सावल्या
वेदनांची आर्तता त्यांच्या गाहिर्‍या आंधाराला

त्याची जखम फारच जाणवली
रक्ताची तया लाली आसमंतावर पसरली

दु:ख मोठ्या उराचे कोणा बोलता समजेना
सांगण्यासाठी ते, दुसरा सूर्य अवकाशात गवसेना

उदय अन् अस्तातही तेवढीच प्रतिमा
जगता मरतादेखील मोठ्यांच्या सारख्याच खुणा

अंधार्‍या रातीतही चांदण्यांचा शिडकावा
सूर्यदेवाच्या तेजावर चंद्राने तोलला

ऐश्या जगता मरता प्रकाशणार्‍या दीपस्तंभाना
माझ्या तोकड्या शब्दांचा नजराणा

-धनंजय