Saturday 3 December 2016

धुंध मनात जपावी पावसाची हिरवी गाणी
वार्‍या संग खेळणारी पानापानातील तरुणाई

 भाताच्या खेचरात अवखळती वाट
हिरव्या समिंदराची
आन् उर भरून पाहाती नजर माह्या कुनबट्याची

चार ओळी .....

तुला तशीच आठवण्याचा खूप प्रयत्न केला
पण विसरताना तू फक्त माझीच होतीस..

५०० लाइक्स अन १०० कंमेंट्स तरी स्टेटस माझी ,कोणाची वाट पाहतेय..

असा लिहायचा ना तो ज्यांना  समजलं त्यांचा घोळ
अन बाकीच्यांसाठी कविता

खरंच प्यायचं ननवता ग
पण शुद्धीत तू जास्त आठवते...

तुझ्याविषयी लिहायला गेलो अन लेखणीचा विसरलो
एकावेळी दोन गोष्टी नाही सुचत ग मला..

खूप साऱ्या वाटांनी ठरवले चालणे माझे
फिरायचे मात्र राहूनच गेले

माझ्या लिहण्यात नको शोधू ग आवेग भावनांचा
शोधते उत्तर त्यांचं तर तुझ्याच मनाच्या कोपऱ्यात

ऊगाच शोधली उकल प्रश्नांची
आधी तिढा होता आता तर पार गणूत झालाय..

काही कळण्याआधीच नाती संपलेली
मग कशाला आता तू आठवतेस

तुझा कायमचं चंद्र असणंच बर होत
चांदणं किती  शीतल होत
आता तर चंद्रही चालतो अन चांदणंही