Wednesday 11 August 2010

पापा

पापा

पापा माझा चिमुरडा आज मला पप्पा बोलला
डोळ्यांतल्या आसावंसरशी घड्याळाचा काटा
तीन दशक माग सरकला
ईवल्याश्या पावलांत मी त्या माझ बालपण बघितल...

दोन्ही डोळा वाहे गंगा आन् जमूना
तेव्हा स्मरे रडक्या पिलासाठीच्या
तयाच्या घरभर चकारा
असा चंद्राच्या साथीला हा सूर्य रोज रातीला जागला

शेरभर दुधासाठी गावभर पायपीट
आणवाणी पायांवर खड्या काट्याची लयलूट,
आज गाडी आन् चाकर तेव्हा मात्र
खांद्यावर भक्कम त्या
मी जग पालथा घातला

शर्टखाली लपवली ठिगळाची बंडी
अन् दुपारच्या जेवणाला म्हणे आज उपवासाची संधी
आईसक्रीमच्या हट्टासाठी त्याच्या अशा कितीतरी तर्‍हा
आजही नातवासाठी खाऊ बघ आधी त्यानेच रे आणला
त्यानेच रे आणला.........