Friday 20 November 2009

26/11

26/11 आज एक वर्ष पूर्ण होतय
या सायंकाळी मुंबई शहरालाही स्वतःच मन हलक करावास वाटल...

26/11

तीन महलातूनी संचारला
थरार चार सैतानान्चा...
अन् समुद्रातील चक्रवाताचा,
आज
माझ्या अविरत गतिस चाप

आकाशात त्या राती शीतल चंद्राबारोबर
एक धगधगता गोळाही जागला (ताज हॉटेलच रात्रभर जळन)
जागली अनेक नाती गोती
बाबा दादा ताई अन्
छूटकिची नजर शोधणारी आई

शांत फक्त निजली
सुसाट गोळयांच्य़ा प्रहारात हरवलेली
काही थंड झालेली रक्ताची थारोळी

त्या माझ्या जखमा
आजही भळभळतायेत
आज जरी नाहीत लाल
पण आठवणी सार्‍याच ठिकाणी
आसवांत वाहतायेत

बापाच छत्र हरवलेली कालची सुमी
आज सैन्यात दाखल झाली
अश्रू जपून पापण्यांच्या कोपर्‍यात
आंगर घेऊन आज उभी राहीली

रहिमचा आज एक पाय लाकडी
तरी हास्य आणिक
किट्लीतला चहाही तैसाच गुलाबी

मर्त्य चढल जरी सरणावरी
पण ना हिरावू शकला हा तांडव
हिंमत माझी
हर एक आघताबरोबर
त्याच प्रखरतेने दिपवणारी
ही येथली शक्ती एकतेची

- धनंजय

गार्‍हाणे

एक स्री जीचा प्रियकर खूप सुंदर आहे
ऐश्या स्रीचे गार्‍हाणे


गार्‍हाणे


नको निघूस सखया ऐसा बाहेर
बघूनीया तुझा रुबाब
होतात सार्‍या मदनिका घायाळ

हे प्रिया या सखया सार्‍या चिडवती मजला
का चोरून त्या बघतात तुजला

सौद्या सौद्यातूनी हालतात पडदे
नाना कारने घरी अन्
सार्‍या रुपगर्वीता आज दारी

आज मी हे छेडता दारातल्या जाईशी
तीही दरवळली आर्त अंतरातूनी
मी पुसता वदली आगमन तयाचे तिच्या घरी

ही सांजही आज अधिकच रंगली
दिसता तव मुखप्रभा
लाजून अधिकच लाल झाली

दृष्ट लागेल माझीच तुजला
तीट करते सावळ्या तुजला

कोठे रे तुजला मी लपवू
करतील कपट हे सारे
लुभावन्या मजपासुनी तुजला

एकच आहे मम वेडी आशा
ऐशी प्रेमबंधात जखडेल
त्यातून मग माझे मरणच सोडवेल तुला

-धनंजय :-)

Friday 13 November 2009

भगवंताचा लाडका

भगवंताचा लाडका

मनात मांडे रचतो तो कसला साधू
असा नसतो साधू जो मनाने अधू

साधू असतो नितळ पाण्यासारखा पारदर्शक
असतो तो सहस्ररश्मीसरखा
आनंदाच दान उधलणार्‍या त्या तेजाच्या साठ्यासारखा...

कधी तो चंद्र आकाशातला
भगवंतरूपी चांदण्याचा शिडकाव
मोहरूपी आंधरात करणारा..

तो बनतो कधी रौद्र अग्निसारखा
जगातले सत्व टिकवण्याकरिता उभ्या ठाकलेल्या
जमदग्नीसुतासारिखा

साधू नसतो कधी फक्त दाढी वाढवलेला भोंदू बाबा
तो असतो दुसर्‍याचे आसू पोसणारा
स्वतः दुख झेलून शेकडो संस्कारक्षम जीव बनविनारा
भगवंताचा लाडका

धनंजय :-)

ऊमाळे प्रेमाचे

ऊमाळे प्रेमाचे

या आकाशाच्या पदरात
किती साठवावे लावण्य तुझे
तरी फेकते अलगद कवडाशे
हे रूपाचे चांदणे तुझे
डोळ्यात तुझ्या झाकताना
उचंबळून येतात सागर प्रीतीचे
इंद्रधनूच्या छटाही अपुर्‍या पडता
वर्णन करताना रंग तुझ्या लोचनाचे
तू हासतेस तेव्हा वाटते
चांदणी वर्षाव व्हावा मजवरी
त्यावरील ओठांच्या या गुलाब पाकळ्या
कधी सांगतील ग सखे
मला उमाळे प्रेमाचे ग उमाळे प्रेमाचे
Dhananjay :-) (Something at d age of 16)

Sunday 8 November 2009

संगम

Venus , शूक्रतारा , Brightest one आणि त्यामुळेच सायंकाळी वा पहाटे देखील हा तुम्हास दिसू
शकतो… यावरच काही कल्पनांचे ईमले रचलेत….


संगम



शांत सुंदर पहाटकाळी
हसत होती बघ ती शुक्राची चांदणी
रे शुक्राची चांदणी

एक आगळी का होती तिच्या मुखावर
स्वयं प्रभेची झळाळी
एक एक करूनी परतू लागले
तारे सारे निजधामी
पण अजुनी का ती स्थिर अशी
का वाट पाहते तिच्या प्रियकराची
शांत सुंदर पहाटकाळी.....

हळूहळू पसरली
एक वाट लालिमेची
तीच असावी जणू त्यांची जागा भेटीची
तीही त्यात गुप्त झाली
त्या आदित्याच्या पाशी हो आदित्याच्या पाशी
शांत सुंदर पहाटकाळी….

असा सुंदर संगम झाला
या शांत स्थिरतेचा त्या तेजाशी

दोघेही बनूनी चमकू लागले सूर्यदेव या धरित्रिशी
ती शांत स्थिरता अचानक निखळलि
जेव्हा त्या तेजापासुनी
मग रजनीनेही गिळुनि टाकले त्याशी
रे मानवा बघ रे तेजाशी...... रे त्या तेजाशी

धनंजय :-)

बकूळ फूल

बकूळ फूल

तस तुझ नि माझे जुनेच नाते
तू शाळेत असताना
आमाच्या आंगणातील बकूळफुलानी ओंजळ भरताना
मी रूप तुझे डोळ्यात साठवत होतो

तस तुझे नि माझे जुनेच नाते
तु कॉलेजमध्ये गेल्यावर
तुझ्या केसात माळ्लेल्या गजर्‍याकडे बघत बसे
हिंमत झाली नाही म्हणून
त्यातून गळालेल्या बकूळफुलांवरच प्रेम करत असे

तस तुझ नि माझे जुनेच नाते
आपल्या पहिल्या भेटीत
मी हेच फूल तुला दिले होत
पण तू मात्र काटेरी देठ दाखवून
न विसरणार्‍या दुखी आठवणीसाठी सलत ठेवलस

तस तुझे नि माझे जुनेच नाते
तस तुझे नि माझे जुनेच नाते.....

धनंजय :-)

Sunday 1 November 2009

थाट भातुकलीचा

असाच एकदा चिमुकल्यांचा भातुकलीचा थाट बघितला अन् बरच काही आठवल

थाट भातुकलीचा !!


कल्लोळ वेल्हाळ मदमस्त गोपाळ
गलका बालकांचा हा घाट काल्याचा
हरि एक आहे मुरारी भातुकलीचा दाणा अमृतापरी

का उरी बाळगावे तत्वज्ञान
जणू कोरडेच पाषाण
बोबडे बोल नसे का पुरे ते आयुष्यास

आणला चिव चिव करूनी दाणा
पाणी, काडीक, अग्नी आणि संसार सारा
चिंची खाली मंडप मांडला, भात आता रांधून झाला
कस जमले चिमुकल्या डोळ्याना, इवल्या इवल्या हाताना

पंगत उठली गंमत संपली, सारी पाखर उडून गेली
एक सुंदर स्वप्न गबाडल

मन मात्र अजूनही स्मरत ते चींचेच गाण
विहीरीखालच्या आंब्याच्या आंबट कैर्‍या,सूर पारंब्या
तळ्यातल्या त्या मासोळी उड्या, उन्हाकाठी सतत उंडरण
आणि बरच काही सांगायाच राहून गेलेले
निपचीत अस मनाच्या काठी पहुडलेल...

-धनंजय :-)