Monday 8 August 2011

विराम

तीच त्याच्यावर खूप प्रेम असत, किंबहुना तिचही, पण तिला ते उमगतच नाही .
दिवस रात्र बरोबर राहणारी बोलणारी भांडणारी ती दोघ.
एकदा धीर एकवटून तो बोलतो....आपल्यातल्या नात्याला एक नवीन अर्थ देशील का?माझ्याबरोबर आयुष्या घालवशील का?
तिचा गोंधळन…. नकार… मी अस कधी बघितलच नाही तुझ्याकडे आपण मित्र म्हणूनच पुन्हा एकत्र राहू पूर्वीसारखे तसेच गप्पा मारू….पण खरच ते शक्य होत का…होत का कधी अस….

विराम (. ,? )

तेव्हा तुझ मुकेपण फार सलल
अन् आज निखळ मैत्रीच्या वरती आपला नात का गेल
याच दुख मनात राहून गेल
ना आता भावना व्यक्त करता येतात
ना शब्द मांडता येतात

तेव्हाच थोडी बंधन घातली असती तर बर झाल असता
उगाचच नात्याला नाव देण्याच्या गडबडीत
आपण एक सुंदर नात आज हरवून बसलोय

आज तुझी बोलताना होणारी तगमग
बोलायच असूनही दूर सारण्यासाठीची धडपड
मनाला पिळ देऊन जाते
आन् ईतक्या जवळ असूनही फक्त डोळ्यांच्या हालचालीपुरती
उरलेली आपली नाती….

खरच का येथेच चार पावल चाललो आपण साथीने
आपाणच होतो की दोघे जयाणी
घड्याळाच्या काट्यालाही हरवल
ज्यांच्या अविरत बडबडीत कधीच नव्हता खंड
आन कधीच नावती वायफलता

मग का अस आज होत?
हाय हेलो च्यापलिकडे जग आपला वावरत जणू नसत

या अस्वस्थ पूर्ण पण अपूर्ण नात्याला
निभावता ना थकलोय आता
अन् म्हणूनच येथे विराम देतो.
स्वल्प का पूर्ण ते काळलाच ठरवू दे
थोडा विश्राम दोहोंच्या मनाला घेऊ दे…