Saturday 19 December 2009

पाउस

पाउस

सरसर सरसर वारा आला ,
भरभर भरभर चला घराला

तो राजबिंडा चालला रस्त्याला,
उडाला फेटा त्याचा
तोही पळाला ..
सरसर सरसर वारा आला….

गडगड गडगड विजा कडाडल्या
तो शूर सेनानी बालसेनेतला
अवचित कुशीत आईच्या शिरला
सरसर सरसर वारा आला….

टपटप टपटप पाउस आला,
नार ती एकटीच शृंगारलेली
भिजली गेली घराच्या आडोशयाला
सरसर सरसर वारा आला…

घनघन घनघन गारा बरसल्या ग्वाल सारे घरातील
आले अंगणात जमवू लागले मोती आभाळीचे
पोटी साठवले तयानी ते खडे
अन् आम्ही हे क्षण अमृताचे

सरसर सरसर वारा आला
गडगड गडगड विजा कडाडल्या
टपटप टपटप पाउस आला
घनघन घनघन गारा बरसल्या
की सरसर सरसर वारा आला .
भरभर भरभर चला घराला, चला घराला…

-Dhananjay

हे भगवंता

हे भगवंता

तुम्हास आमची आठवण झाली
आमच्यासाठी हाच हिरामोलाचा क्षण
आज आज खरच बदललाय पार
कोणाला वाटे ना वाटे पण येथेच बदलल हे सार
मनाच्या पार पोहचले सारे
नश्वर ईएश्वर सार काही येथल तुझ्या माझ्यातला
राम राहीम मासिह कोई दुजा नाही
स्टालिन तू सुध्दा त्याच अस्तित्व का नाकारून गेला
समजले आज मजलाही सर्वत्र चांगले व्हावे
हाच एक उद्देश भगवंत असो वा नसो
सर्वत्र चांगला हाच त्याचा ना आपला उद्देश आहे
खरच पार बदलतय आता सार.......

-Dhananjay

Sunday 6 December 2009

कान्हा

कान्हा

हळूहळू बघ रजनीनेही कात टाकली रे कात टाकली
लाल रंगाचा शालू नेसून
बघ ती नववधु आली
किलबिल किलबिल वाजंत्रीही वाजे
सूर कान्हाच्या बासुरीचे
दूरवर उमलती सहाश्ररश्मीसवे
किरणांचे सडे पानवेलीतून टाकत
आदित्यानेही डोंगरमागूणी त्याशी
डोकावून पहिले रे डोकावून पहिले
हळूहळू बघ ….
मंद पवनही त्याशी खेळे
मोरपीस ते सुंदर पीतांबर डोले
सवळ्या पाण्यात जणू भास्कराने
न्हाऊ घातले रे न्हाऊ घातले
-Dhananjay