Saturday 19 December 2009

पाउस

पाउस

सरसर सरसर वारा आला ,
भरभर भरभर चला घराला

तो राजबिंडा चालला रस्त्याला,
उडाला फेटा त्याचा
तोही पळाला ..
सरसर सरसर वारा आला….

गडगड गडगड विजा कडाडल्या
तो शूर सेनानी बालसेनेतला
अवचित कुशीत आईच्या शिरला
सरसर सरसर वारा आला….

टपटप टपटप पाउस आला,
नार ती एकटीच शृंगारलेली
भिजली गेली घराच्या आडोशयाला
सरसर सरसर वारा आला…

घनघन घनघन गारा बरसल्या ग्वाल सारे घरातील
आले अंगणात जमवू लागले मोती आभाळीचे
पोटी साठवले तयानी ते खडे
अन् आम्ही हे क्षण अमृताचे

सरसर सरसर वारा आला
गडगड गडगड विजा कडाडल्या
टपटप टपटप पाउस आला
घनघन घनघन गारा बरसल्या
की सरसर सरसर वारा आला .
भरभर भरभर चला घराला, चला घराला…

-Dhananjay