Friday 20 November 2009

26/11

26/11 आज एक वर्ष पूर्ण होतय
या सायंकाळी मुंबई शहरालाही स्वतःच मन हलक करावास वाटल...

26/11

तीन महलातूनी संचारला
थरार चार सैतानान्चा...
अन् समुद्रातील चक्रवाताचा,
आज
माझ्या अविरत गतिस चाप

आकाशात त्या राती शीतल चंद्राबारोबर
एक धगधगता गोळाही जागला (ताज हॉटेलच रात्रभर जळन)
जागली अनेक नाती गोती
बाबा दादा ताई अन्
छूटकिची नजर शोधणारी आई

शांत फक्त निजली
सुसाट गोळयांच्य़ा प्रहारात हरवलेली
काही थंड झालेली रक्ताची थारोळी

त्या माझ्या जखमा
आजही भळभळतायेत
आज जरी नाहीत लाल
पण आठवणी सार्‍याच ठिकाणी
आसवांत वाहतायेत

बापाच छत्र हरवलेली कालची सुमी
आज सैन्यात दाखल झाली
अश्रू जपून पापण्यांच्या कोपर्‍यात
आंगर घेऊन आज उभी राहीली

रहिमचा आज एक पाय लाकडी
तरी हास्य आणिक
किट्लीतला चहाही तैसाच गुलाबी

मर्त्य चढल जरी सरणावरी
पण ना हिरावू शकला हा तांडव
हिंमत माझी
हर एक आघताबरोबर
त्याच प्रखरतेने दिपवणारी
ही येथली शक्ती एकतेची

- धनंजय