Thursday 27 December 2012





नयनांच्या पलीकडे वसते एक गोकुळ
वासुदेवाच्या डोळ्यात नीर्
आला यमुनेला पूर

एक चिमकुलस गाव
तेथे तुटला रे जीव
दोन फुटात सोडून आलो
सात समुद्र आन् एक आभाळ

गावभर नाचला
कडेवर निजला
याशी हुस्ती आईची पापी
आजीचा खाऊ
बाबसंग खेळू

किती  काय साठवण
शब्द एकेक  तुझा
आज काळजात घर घर

बपाच्या त्या आठवणीत
जीव अजुन एक रमला
पिल्लासठी ज्यांचा जीव आजही टांगला

हात सूरकती केस झले रे पांढरे
बाप एक,  मझा पण.. तिकडे
देवबाप्पा काळजी सगळ्यांची,…. घे तू  बघ रे

धनंजय