Tuesday 9 February 2010

गणिताच्या बाई

गणिताच्या बाई

आज जर भेटल्या पुन्हा गणिताच्या बाई
विचारीन त्याना तुम्ही शिकवलेल
या जगात काहीच कसे लागू होत नाही?

एक अधिक एक बरोबर अकरा
हा जीवनाचा खरा पाढा
मला का नाही शिकवला?

तुम्ही नाही पण नंबर मात्र सारेच भेटत
बघा ना आता, या 36 च्या आकड्याच वेडच भारी
कधी बॉस कधी ओळखीत तर कधी अनोळखी
अं महत्वाचा याच स्थान
लग्नाच्या बाजरी ,
त्याची जुळवाजुळव म्हणजे आयुष्यचाच गणित ना..

पगारच्या दिवसा अखेर देखील
हा कसा शून्याचा आकडा माझ्याच वाटेला येतो?
अन् आयुष्यबर गर्दीत वावरणारा हा जीव
जाताना कसा 1टाच जातो?

राजकारणातील गणित तर तुम्हाला पण नाही सुटणार
कालच जोडलेली प्रमेये आज विस्कटणार
आन जुने गृहीताक मोडीत काढून
नवे सिधांत मांडले जाणार

बराच काही मांडता येत
जेव्हा हे आयुष्याचा गणित तुम्हाला खोट ठरवून जात
आन् तेव्हा खरच आतमध्ये खूप काहीतरी सलत
तसाच पाटीवर उतरल्यासारखा
हे सार सरळ्च हव होत अस वाटत

पण बाई तुम्हाला देखील कस विचारणार
कालच कळाल तुमची देखील अखेरीस इन्फिनिटी झालीय
बहुतेक ही कोडी सुटण्या पूर्वीच
आमच्या देखील वर्तुळाची वाटचाल
अशीच शून्याच्या पूर्णत्वाकडे चाललीय...

-धनंजय