Friday 26 February 2010

ओला प्रणय

ओला प्रणय
पावसाची सर मृदगंध मातीचा
भीजलेला अन् देह तुझा

ओघळनारे थेंब जैसे
चमकते चांदणे
की मोतियाची लड
तव कटीप्रदेशावर

अशाया श्रवणसरीतही
ग्रीष्म ठाकला माझिया मनी
टपटपत्या बिंदूची जेव्हा
होते तुझ्या ओठांशी सलगी

एक शुभ्रपतका उत्तरदक्षीण
अन् गडगडत्या वार्‍याने
उडावीता पदर
रंगला ओला प्रणय

येऊन सामावेल का ती मिठीत माझ्या?
का अवचीत लाजेल मुग्धा
देखता ओले प्रतिबिंब तिचे मम नयनात

हनुवटीवर स्पर्श साजनाचा हलकासा
या लाजळूचाही अभिनय मग गळून पडला

मोरपंखी स्पर्श सार्‍या कायेवरून
अन् आज ओले मिलन रंध्रारंध्रातून

-धनंजय