Tuesday 26 May 2020

....गावकुसाबाहेरचा कोरोणा...

....गावकुसाबाहेरचा कोरोणा...
पाटयाचा दगड घेऊन हिंडतोया.
कोणाचा बी दार आज उघर न्हाय,
पोटास शिळा भाकर तुकडा वाढणारी माय पण दारात घेईना,
कोणास ठाऊक पर कोणी या उन्हाच पाणी बी पुसंना,
रात चालून दमली ,
आज पहिल्यांदाच चार घरं बराबर चालली वाटान,
पर कोणी कोणाशी बोलणं
तोंडावर फडक बांधून हिंडतयात
अधान मधन भोंगा फिरतोय
कोरोना आला बोंबलतोय
बाकी काही कर पर
लेकरांच्या पोटची भाकरी तोडू नको
आम्हां नाय राशन ना घर
हे भल्या माणसं हक्काची शिळी भाकरी काही तू तोडू नको..
- धनंजय