Sunday 11 October 2009

शुन्य मन

लग्न झाल्यावर परतणारी प्रेयसी ...तिची अन् प्रियकराची भेट किवा भेटिचा प्रयत्न...
नेहमीच त्याच्या मनात खळबळ माजवून जातो
मग तो तिच्याकडे एक गार्‍हाणे मांडायचा प्रयत्न करतो...


शुन्य मन

शुन्य मन,
शुन्य अस्तित्व
आता ना उरले पाने ईतिहासाचे
ना अट्टाहास त्या शब्दांचा,
अन् कल्लोळ क्षणांचा //धृ//


उगाच वेचले क्षण
जे दवबिंदू मृगजलातले
माझेच मला ना गवसले
सखे सांगू काय तुझे हरवले //१//

एकच ध्यास जो हुकला
जुळवत असता तुकडे कोलजाचे
अखेरीस रक्त मझेच सांडले //२//

भुगर्भात मी जो दडवला
तप्त ज्वालामुखी
त्या आठवनीस माझिया वाट दाखवू नकोस
रात्री संपतील अवघ्या
पण ही धग संपणार नाही //३//

पापणीत तुझीया ताकद जन्मातरीची
ती वावटळ घेऊन सखे माझ्या दारी पुन्हा येऊ नकोस
आताशा कोठे मी
सरळ चालायला शिकलो
पुन्हा एकवार मागे फिरुनी
नजरफेक ती करू नकोस //४//

Dhananjay