Sunday 11 October 2009

जन्म आईचा

जन्म आईचा


लागता चाहूल तयाची
मोहरले तन मन माझे
छुमछुम आज पैजणांची ..
रोमरोमात पांघरले
अस्तित्व आज मी दुजे ....

खळबळ तयाची
अन् भंडणेही तेही मजपाशी
कैसे सांगू मी हे जे रूप अदृश्य अजुनी
तयाचे सौंदर्य मी कैसे अनुभवले....

कैसे चित्तारू सखे हे सुख मी वेदनांतले...
निरकर जो होता ओंकार
आज तयाचे ईवले ईवलेहात साजीरे
अन् पदचिन्हाचे ठसे माझ्या गर्भावर

घ्यावी वाटे नभी भरारी
तलवार तळपवी शिवबापरी
कधी मन उधानते कळिंदीच्या वनी
शोधते निळसर मुरली , प्रेम राधेचे उरी
ऐसे कैसे हे शहारे;
कोण बरे आर्त आत ऐसे साकरावे...

स्वर हे आई आई आज मम जाणवते,
कैसे वर्णू हे सुख माझीया नवजन्माचे;
सांग सखे कैसे वर्णू सुख माझीया आईपणाचे.....

Dhananjay