Monday 12 October 2009

कृष्ण - गोरी

हे एका सुंदर चित्राचे वर्णन आहे,
रात्रीची वेळ,
मागे गोकुळ झोपलेले,यमुनेच्या लाटंकाठी भेट गोरीची एका निळसर आभेशी

कृष्ण - गोरी

सजना भेटीची लगबग
नको साज शृंगार गोरी
नको ते कंकन अन् कर्णफूल
नको पैंजण जागवी जे गोकुळ

हूरहुर आनवार अधीर् मन
तव स्पर्शाची आठवण
शहारले आज सारे तन

चालली गोरी
लयायला शृंगार चांदण्याचा देहावरी,
कशास हवे ते काजळ
असता लोचनात गर्द आभा रातीची,
लांबसडक बोटे ती फिरतील ना या बाहुवरती
मग कशास हवी ती कंकणे काचकडीची,
नको ती माळ मोतियाची
मिलनास जी अडसर वैरी,
गंध मोहवणारा असता तयाचा
कशास हवा गजरा जाईचा...

हलकेच दबकत टाकत तळवे
ओलांडंत सावळ्या रात्रीच्या सावल्या
गुजगोष्टी यमुनेच्या लाटांशी
किरकिर् आज रातकिड्यांची
अन् जुगलबंदी काजव्याची

दिसता तीरावर निळसर मुरारी...
थबकली तेथेच रांग पावलाची

क्षणभर चुकामूक डोळ्यांची
हालली पापनी साठवता ते रूप मनोहारी

थांबवले विश्वकर्त्याने चक्र गतीचे
टिपण्यास हे मिलन कृष्ण - गोरीचे......

Dhananjay