Wednesday 14 October 2009

गळालेले दशक

ती दोघे नहमी भेटायची , अविरत बड़बड़ायाची,
अचानक सार काही थाम्बल अन
आज दशकानंतरची त्यांची भेट.....त्याच नेहमीच्या जागी....

गळालेले दशक

जून ना झाली ती अज़ुन
तीच शांतता तीच्या शब्दांत
सरले जरी दशक मध्यांतरी
तरी नज़र तैशीच अज़ून त्या डोळ्यामधुन...

हास्याची तीच स्मीत लकेर,
शब्दही न बदलले ना
भावना त्यामागील;
एक केस पांढ़रा अन काही सुरकुत्या
बस ईतकच....
बाकी बदलली नाहीत अजुनही ती स्थळे
अन त्यामागची पाठमोरी पदराची हालचाल..

तेच अवखळ भाव
चंचल तैशीच रमणी
तीच हूरहुर आजही या भेटीची
अन तगमग वाट बघणा-या बुबुळान्ची

तैसाच वाहीला नीर्झर गप्पांचा
त्याच उत्कटतेत बुडले होते शब्द तीचे,
भांडनेही तेथेच अड़कली
एका आइस्क्रीमबरोबर आजही, ती विरघळली...

आजही मी बुडालो आकंठ
न राहीले भान मावळतीच्या दिनकराचे
अन सरलेल्या त्या दशकाचे......



Dhananjay