Saturday 31 October 2009

निळी निळी शाई

निळी निळी शाई

निळी निळी शाई हात रंगवून जाई
अनेकदा बजावल हातच राखून बोलायच... लिहायच
तरीदेखील अखेरीस डाग मागे ठेऊन जाई

हळूवार शब्दाना रेखाटावा म्हटल
पण जमलच नाही
सार काही होतच इतक उत्कट
का होता भावनांच्या गर्दीचा कोंडमारा ?
काहीच सहन झला नाही तिजला

अवखळ अल्लड तिची निळाई रंगली
मेहेन्दीपरी तळहातावरी

हा प्रयत्न अपुरा
हातावर टिपण्या गेली मनातल्या व्यथा सार्‍या
दाटी एवढी झालिया शब्दांची ...
समरसले अवघे एकमेकांतुनी
आता ना उरले अस्तित्व कोणाचे
ना तुझे ना माझे ना हातावर उतरवलेल्या शब्दांचे

अवघा रंग एकचि झाला
निळ्या रंगात तुझ्याच हात माझा आज रंगला....

-धनंजय