Saturday 17 October 2009

युगपुरुष

युगपुरुष

अजुन तर जगायचाय आहे तुला
पहिल्याच ठेसेला घाबरलास
कस चालायच असे हे
अजुन तर हे जग पाहायचाय तुला

दुसर्‍याच्या प्रेतावर
शेकनारीही लोक भेटतील तुला
दुसर्‍याच्या सुखासाठी
आयुष्य मिटवणारिही भेटतील तुला
अजुन तर .....

म्हणतात १०० वर्षांत एकच न्युटन येतो
आणि जग पार बदलवुन टाकतो
पण मीही म्हणेल तोही नाही सर्वस्रेष्ठ
कारण हजार वर्षात एकच गांधी येतो
व जगण्याची रीतच बदलवून जातो
अजुन तर.....

हिरा कशाला चाचपडतो कोळश्याच्या खाणीत
आधी स्वत:च जपणूक कर सदगुणांची
तरच एखादा कृष्ण जन्मेल तुझ्या पोटी
जो पूर्णत: मानवजातच बदलवुन टाकेल
व तोच युगपुरुष ठरेल...

Dhananjay