Thursday 15 October 2009

शेवटली भेट

(I know it's not best by me, still.....)

शेवटची भेट त्याची अन् तिची;
एका टेकडीपासली नेहमीची जागा अन् समोर विस्तीर्ण वनराई , खोलवर पसरलेली दरी
ती दोघ एकमेकांपाशी बसलेली..... कोणी काही बोलतही नाहीय अन् आता हुन्दका आवरतही नाहीय

शेवटली भेट


पश्चिमतटावरले रंग केसरी
ही पंखांच्या हालचलीची रांग
डोंगरापालीकडील गर्द हिरवळ
अन् तुझ्या माझ्यातली दरी मोजणारी खोली
या अखेरच्या एकत्रीत कतरवेळी ...

हा; ही एक भेट शेवटली अन्
कालचक्राची दाते थांबलेली
या क्षणीकतेवर कोरले सारे थेंब आजवर वेचलेले
काही मला गवसलेले अन् काही तू साठवलेले

आज या सांजेत कोणी बोललेच नाही
अधरांची थरथर अन् अश्रूंची फुले कोणी थांबवलीच नाही

अस्तित्व असे हे शून्याचे
वाटे भरभरून तुजला साठवावे
रोमारोमांतून साधावा हा प्रणय
तुझे तुपण पूर्ण कळावे ,
आजवर जे कधी ना समजले :)
हे गूढ आज जाताना तरी उलगडावे

ना समजो माझ्या मनाचा पीळ तुझला
तुझ्यातील खळबळ जाणवू दे मजला

नकोस देऊ मज कारणे
खरच नाही मागणार मी उत्तरेही
नाही दिसणार तुझ हा कृष्ण फिरोनी माघारी
स्पर्श शेवटला डोळ्याना जाणवू दे


आता ना बोलायचे काही
काय सांगू सखे संपलेच सारे,
आश्वथाम्याचे जीवन लाभले
आन् चिरंजीवी वेदना आमुच्याया भाळी ...

Dhananjay