Sunday 11 October 2009

थांब ना

ट्रेनचा तो प्लॅटफॉर्म आठवतो का ?
त्याने तिला जाता जाता आडवन, अन् नाही नाही म्हणता म्हणता तीच अखेरीस आज तीसर्‍यादा परतन...
काय असता हे शेवटी का ती थांबते....


थांब ना


थांब ना...
जाता जाता कितीदा नाही बोलायच,
अन् कितीदा आपण निघायच,
दोघांसही हवेच असता ना तेथे घूटमळण;

कधी तू तर कधी मी थांबवयाच,
नजरेतच पायाना बांधून टाकायच.
घड्याळाच्या काट्यात पाय अडकवून टिपयाचे क्षण सारे,
मिनिट मिनिट मोजत असे तासन् तास घालवयाचे.
नेहमीचच हे जणू ठरलेल...

ईतक सारे बोललेलो तरीदेखील राहिलेल,
शेवटल्या दोन मिनिटात असे काय मिळणार ?
असला काही विचारू नका हो तुम्ही
ज्याने हे अवघड जागेचे दुखन विकत घेतलेल
त्यालाच हे कळलेल...

ज़ातानाही एकदा मागे वळून बघावस वाटत
मग अडखळतात पाय ...अडकतात नजरा
दाटून येतात शब्द ओठांवर
मनाची तगमग अल्याड अन् पल्याड
तितकाच तीव्र हा आकांत दोन्ही नदीतीरांत

गेलेले जरी पाय पुढच्या प्रवासास,
असला जरी देह दुसर्‍या मुक्कामात,
दोन भेटीदरम्यान तेच जग व्यापून असत
हातात जरी काम पण मन मात्र;
त्या नेहमीच्या संकेतस्थालापाशी घूटमळत..

ती हूरहुर मग घड्याळाच्या काट्यांवर बरसते
त्याच्या धिम्या हालचलींवर त्रागा करते
कितीही वेड्या मना आवारावे तरी
ती ओढ अनामिक तेथेच नेते
सन्दर्भ परत सारे बदलता
आता मिनिट काट्याच्या लगबगीवर एकच उत्तर
थांब सखया..थांब ना..

Dhananjay