Saturday 17 October 2009

आई

आई

मनमंदरी मजपाशी आई तूच ग असते
तुज येता स्मृती शतपाझर हृदयातला
डोळ्यांतल्या सागराची ग सीमा ओलांडतोय ..आई ओलांडतोय

प्रत्येक क्षणी मजबरोबरी तूच ग असते
या मातीच्या देहास कारण तूच ग चित्तारले
जगाच्या रणंगणात मजला तूच समर्थपणे उभे केले

मनमंदरी मजपाशी ....

आई तूच ग माझे उपनिषद् नि वेद आहेस
स्वाभिमान निरहंकारीता सत्य परी वदावे
दया क्षमा शांती प्रेम हे आंगी बनावे
तूच तर मला माणूस होण्यास शिकवले

मनमंदरी मजपाशी ....

वाटते बाळ होऊनी तुझ्या कुशीत ग शिरावे
जगाच्या कोळाहलापासून दूर शांत पडावे
तुझी येता आठवण डोळेही आठवण डोळेही वाट करून देता त्या नीराशी

मनमंदरी मजपाशी ....

मग माझ्या शब्दासही ओलावा येतो
आणि या आंधार्‍या जीवनात फक्त
तुझा शांत मंद तारा ग दिसतो

मनमंदरी मजपाशी ....

Dhananjay