Tuesday 13 October 2009

वेडे मन

वेडे मन

का हे मन वेडे माझे
कोणापासून पळते
उमजत नाही त्यास
कल्लोळ भावनांचे
ना जाने कोनते कोडे
आज त्यापाशी घुटमलते

आकृतीही स्पष्ट नाही
हा साद नक्की कोणाचा
एक बट डोळ्यावरुनी
चेहरा सावलीत जणु ओळखीचा

दूरावत आहे छूमछूँम पैजनांची
मग मनास पड़तो पिळ
आठवनींच्या ओलाव्यावरुन
मन होते अधीर

ओठावरती थोपवला मी
सागर भावनांचा ...
निनादते तरी कंठात
अस्फुटतेची घुसमट
अन मग एकच वाट
ऩयनांतून उष्म तरंग

भिजावे आता पावसात स्वछन्द
न कळावे कोणा
कोणते थेम्ब ओघळति गालवरुन
नीर कोणते पावसाचे
अन कोणी टीपलेत दुखाचे अंतरंग

Dhananjay